हातकणंगले / वार्ताहर
कोविड -19 या विषाणूजन्य आजाराचा फैलाव व केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्देशानुसार आळते (ता. हातकणंगले ) येथे दि ३o – १२ – २o२o ते ३१ -१ – २०२० या कालावधीत भरणारी ‘ रेणुका ‘ देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. याबाबतचे निर्देश तहसीलदार हातकणंगले यांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनास दिले आहे.

प्रतिवर्षीप्रमाणे रेणुका देवीची यात्रा भरविणे संबंधि स्थानिक प्रशासनाच्या वतीने तहसीलदार हातकणंगले यांच्याकडे मार्गदर्शन मागितले होते . त्या अनुषंगाने यात्रेच्या निमित्ताने होणारी गर्दी व कोविड -19 या विषाणुजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी ही परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबतच्या पत्राद्वारे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने स्थानिक प्रशासनाला कळविण्यात आले आहे.
रेणुका यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रासह,कर्नाटक , आंध्रप्रदेश या राज्यातून लाखो भाविक लोक मोठ्या प्रमाणात येत असतात.
