चिपरीमध्ये शाहू आघाडीकडे इच्छुकांची गर्दी – मा . सरपंच बबन यादव

चिपरी / प्रतिनिधी

    ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यामधील 33 गावांमध्ये राजकीय उलथापालथी होत असून अनेक गावांमध्ये या निवडणुकीत काट्याची टक्कर होणार आहे . 17 सदस्य संख्या असलेल्या चिपरी गावामध्ये सुद्धा राजकीय वातावरण तापत असून येथे सत्ताधारी ग्रामविकास आघाडी, राजर्षी शाहू आघाडी व सत्ताधारी ग्रामविकास आघाडीच्या विरोधात परिवर्तन घडविण्यास नव्याने उदयास आलेल्या परिवर्तन आघाडी या तिन्ही आघाड्या स्वतंत्र लढण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत .

     चिपरीतील या निवडणुकीविषयी बोलताना राजर्षी शाहू विकास आघाडीचे नेते माजी सरपंच बबन यादव म्हणाले, राजर्षी शाहू आघाडीचे प्रमुख सुदर्शन पाटील, रावसाहेब भोसले, दिलीप भानुसे यांच्या नेतृत्वाखाली नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना संधी देत समविचारी लोकांना एकत्र घेऊन पॅनेल बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून सत्ताधारी ग्रामविकास आघाडीच्या कार्यशैलीवर नाराज असलेले लोक राजर्षी शाहू विकास आघाडीकडून निवडणूक लढविण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत . त्यामुळे उमेदवारीसाठी राजर्षी शाहू विकास आघाडीकडे इच्छुकांची गर्दी वाढत आहे . विकासाची दृष्टी व सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण असलेल्या व्यक्तींना राजर्षी शाहू आघाडीच्या वतीने उमेदवारी दिली जाईल असेही यादव यांनी शेवटी सांगितले.

error: Content is protected !!