शेतकरी बाळासो टारे यांनी घेतले फोंड्या माळावर “देशी केळीचे ” उच्चांकी उत्पादन …

हातकणंगले / प्रतिनिधी
     अफाट मेहनत , जिद्द, चिकाटी आणि नियमित सातत्य यामुळे आळते (ता. हातकणंगले ) येथील प्रगतशील शेतकरी बाळासो भुजाप्पा टारे यांनी, फोंड्या माळावर “देशी केळीचे ” भरघोस उत्पादन घेऊन केळी पीक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला . योग्य नियोजन व विक्री च्या माध्यमातून ते प्रति वर्षी लाखो रुपये उत्पन्न घेत आहेत.

बाळासो टारे –
केळी उत्पादक,शेतकरी – आळते ता.हातकणंगले

      बाळासो टारे यांची घरची चार एकर शेती आहे. यामध्ये ते अनेक वर्ष 20 गुंठे ते 40 गुंठे क्षेत्रात देशी केळीचे पीक घेतात. जमीन हलक्या प्रतीची असल्याने शेणखत, सेंद्रिय कर्ब व बाजारातील इतर खते यांचे योग्य नियोजन साधत ते केळी पिकात नवनवीन प्रयोग करत असतात. ऊस, पालेभाजी, फळभाजी या पिकापेक्षा शेतकऱ्यांनी बाजारामध्ये उठाव असणाऱ्या व कमी श्रमात भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या केळी पिकाकडे पाहिले पाहिजे, असे टारे यांचे मत आहे.
       दहा वर्षां पूर्वीपासून बाळासो टारे यांनी देशी केळीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. प्रथम वर्षी आलेल्या अडचणी व त्यामधून योग्य मार्ग काढत उत्पादन व त्यानंतरची विक्री यांचा ताळमेळ घालत त्यांनी ही किमया केली आहे. वातावरणातील बदल,नैसर्गिक आपत्ती आणि बाजारपेठेतील चढउतार या व इतर गोष्टींचा या पिकावर फारसा परिणाम होत नसल्याचे त्यांचे मत आहे.
      मुळातच देशी केळी ही नैसर्गिक आपत्ती व रोगाला कमी प्रमाणात बळी पडत असल्याने त्याचा आर्थिक नियोजनावर परिणाम होत नाही असेही ते सांगतात.
      बाळासो टारे यांनी देशी केळीची लागवड ६ x ८ अंतरावर केली असून 20 गुंठे क्षेत्रासाठी पाच ट्रॉली शेणखत, टाकून उभी आडवी नांगरट केली आहे.केळी रोप लागण करते वेळी बेसल डोस सह, बुरशीनाशकांची आळवणी व फवारणी केली आहे. पहिल्या वर्षी केळी पिकामध्ये इतर आंतरपीक घेऊन त्यांनी लागवड व इतर खर्चाची बचत केली आहे.आणि केळी उत्पादन सुरू झाल्यानंतर बागेची स्वच्छता राहण्यासाठी योग्य नियोजन केले आहे. त्यामुळेच केळीचे घड पोसवण्यासह रोगांचा प्रादुर्भाव कमी दिसत आहे. उत्पादित केळीची विक्री स्थानिक बाजारपेठेसह मागणीच्या ठिकाणी ते पाठवले जाते. याकामी त्यांचे पुत्र, पत्रकार धनंजय टारे व कुंटुंबाची त्यांना मोठी मदत होते.

     अस्मानी संकट, भरोसेमंद नसणारी बाजारपेठ, व्यापारी वर्गाची साखळी, उत्पादित मालाची सरळ ग्राहकापर्यंत विक्री…..याची सांगड घातल्यास शेती क्षेत्रासारखे दुसरे कोणतेच उत्तम क्षेत्र नाही…….

error: Content is protected !!