आत्मदहन केलेला सामाजिक कार्यकर्ता नरेश भोरे याचा मृत्यू ; नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार , नगरपालिकेच्या इतिहासात पहिलीच घटना ……

इचलकरंजी / प्रतिनिधी
     आत्मदहनाचा प्रयत्न करणारा सामाजिक कार्यकर्ता नरेश सिताराम भोरे (वय वर्ष – 48 , रा.सोलगे मळा , शहापूर रोड , इचलकरंजी ) याचा आज सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत भोरे याच्या नातेवाईकांनी घंटागाडी चालक अमर लाखे व नगरपालिकेचे सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जात नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. घंटागाडीस डुक्कर बांधण्याच्या कारणावरून घंटागाडी चालक अमर लाखे (रा . इचलकरंजी ) याने सामाजिक कार्यकर्ता भोरे याला मारहाण केली होती. इचलकरंजी नगरपालिकेच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे .

     अधिक माहिती अशी की , सामाजिक कार्यकर्ता नरेश भोरे याला मेलेले डुक्कर जबरदस्तीने घंटागाडी चालक अमर लाखे याने उचलुन टाकण्यास लावले होते. व मारहाण केली होती. या मारहाणीच्या व घटनेच्या निषेधार्थ भोरे यांने सोमवारी आत्मदहनाचा इशारा दिला होता .
     भोरे यांनी सोमवारी दुपारी अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले . त्यामध्ये तो भाजून गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ शिवाजीनगर व शहापूर पोलिसांनी इचलकरंजी येथील आयजीएम् हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते . प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले . पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला . ही बातमी नातेवाईकांना समजल्यानंतर नातेवाईक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले . त्यांनी मृत्यूस जबाबदार असलेला घंटागाडी चालक अमर लाखे व नगरपालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने हॉस्पिटल आवारात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. नरेश भोरे यांनी आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला इशारा दिला होता. परंतु प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसल्यामुळे आज त्यांना जीव गमवावा लागला असल्याचे नागरिकांतुन बोलले जात आहे .पुढील तपास पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!