अजूनही जागे व्हा.! नाहीतर येणाऱ्या काळात काही विद्यार्थ्यांच्या आत्महत्या घडतील हे शाश्वत सत्यच..

    आधीच्या परिक्षेच्या गुणवत्तेचे मार्क लक्षात घेऊन, आताच्या कोरोना काळात न झालेल्या परीक्षेचे मार्क विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळाला असला तरी, अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. सुरवातीला विद्यार्थ्यांना सांगितलं गेलं होतं, न्हवे बातम्या सामोरे आल्या होत्या. सर्वांना पास केलं जाईल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनावर घेतले नाही. पण आत्ताचा निकाल पाहता, तो खरच विद्यार्थ्यांना मोठं दडपण निर्माण करणारा आहे. जसे निकाल लावणाऱ्यांनी आधीच्या गुणवत्ते वरून मार्क देऊन स्वतःची बाजू मोकळी केली, तशीच त्यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूचा ही थोडा विचार करायला हवा.
   कारण काही घरगुती कारणामुळे मुळे असो, महापुराचा बसलेला तडाका असो अथवा घरच्या परिस्थितीमुळे रोजच्या रोजगारावर जाणारे विद्यार्थी असोत. या कारणांमुळे काही विद्यार्थ्यांना वर्षाच्या पहिल्या परीक्षेत गुण कमी मिळाले असतील, पण अश्या विद्यार्थ्यांना वर्षाची दुसरी परीक्षा ही एक संधी असते, पुन्हा अभ्यास करून मार्क मिळवण्याची. पण ही संधीच कोरोना मुळे हुकली आणि आधीच्या परीक्षेच्या आधारे मार्क दिल्यामुळे, अनेक विद्यार्थी अनेक विषयात नापास झाले.
    पण एक विचार करावा एखाद्या विद्यार्थीचे वर्षातील पहिल्या परीक्षेत ३ विषय राहिले असतील व त्याचा आधार घेऊन वर्षाच्या दुसऱ्या परीक्षेत (कोरोना मुळे परीक्षा न झालेल्या) ४ विषय जर मागे ठेवले तर वर्षाचे एकूण ७ विषय झाले व पुढच्या वर्गात गेल्यावर तिथले ६ विषय एकूण १३ विषय एखाद्या विद्यार्थी देऊ शकेल का….? हे एक उदाहरण आहे. या विषया पेक्षाही काही विद्यार्थ्यांना अधिक विषय घेऊन बसावं लागणार आहे. त्यांच्या कुवतीचा ही विचार करावा. अशी परिस्थिती असेल तर विद्यार्थी हातबलच होतील ना..? आणि हातबल झाल्यावर विद्यार्थ्यांचे चांगले झेंडे लागतील का, आत्महत्या घडतील हा नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. काही ठिकाणी समजतंय की राहिलेल्या विषयाचे MCQ टाइप परीक्षा घेतली जाईल, तर काही ठिकाणी समजतंय रीतसर पेपर घेतले जाईल..
   यावर योग्य तो विचार करावा. MCQ टाइप परीक्षा घेणार असाल, तर तुमच्या विचारांच स्वागत आहे. पण रीतसर परीक्षा घेणार असाल तर विद्यार्थ्यांच भविष्य अवगड आहे. विद्यार्थी हे देशाचं भविष्य मानलं जातं पण हेच भविष्य आज अंधारात आहे

                        यावर नक्कीच विचार व्हावा…!

     प्रथमेश इंदुलकर

error: Content is protected !!