कर्तव्य फौंडेशनच्या वतीने फार्मासिस्टचा सन्मान

जयसिंगपूर / प्रतिनिधी
    कर्तव्य फौंडेशनच्या जयसिंगपूर यांच्यावतीने कोरोना महामारी कालावधीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मेडिकल (फार्मासिस्ट) दुकानदारांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देवुन सन्मान करण्यात आला.२५ सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण देशात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. या कोविड १९ विरुद्धच्या लढाईमध्ये वैद्यकीय     अधिकारी , डॉक्टर्स , आरोग्यसेवक , शासकीय निमशासकीय कर्मचारी , प्रशासन , पोलीस कर्मचारी फार्मासिस्ट आदिनी स्वतःसह परिवाराची आरोग्याची काळजी न करता परिश्रम घेतले. अनेक ठिकाणी अनेकांचा कोरोणा योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

  मात्र यांच्यातून वंचित राहणाऱ्या फार्मासिस्ट मेडिकल दुकानदारांचा सन्मान करण्याचा निर्णय येथील कर्तव्य फौंडेशनच्या वतीने घेण्यात आला होता.
   प्राथमिक आरोग्य केंद्राचे फार्मासिस्ट सुनील हाके यांच्यासह शहरातील या महामारीत प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या मेडिकल दुकानदारांचा सन्मान करण्यात आला.कर्तव्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक हुडेद ,उद्योजक रमेश जाधव, उमेश घोडके,मुन्ना विश्वकर्मा, सौ.अर्चना भोजणे सौ.मयुरी पाटील,अमीरखान मुल्ला, समिर कलाईगार.यांच्यासह फाऊंडेशनचे संचालक सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!