वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पेठवडगांव / प्रतिनिधी
         वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेज वडगावमध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वडगाव विद्यालयातील ध्वजपूजन व ध्वजारोहण ज्येष्ठ शिक्षक पी.जी.सुब्रमणी यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या स्मृतीस्तंभाचे पूजन माजी उपनगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका स्कूल कमिटी चेअरमन श्रीमती प्रविता सालपे यांच्या हस्ते झाले. विश्व अंकाचे प्रकाशन माजी उपनगराध्यक्ष स्कूल कमिटी सदस्य उद्योगपती रमेश बेलेकर यांच्याहस्ते संपन्न झाले.

     या प्रसंगी नगरसेविका नम्रता ताईगडे, महेमून कवठेकर, शबनम मोमीन, अलका गुरव,मुख्याध्यापक आर.आर. पाटील, उपमुख्याध्यापक एस. डी. माने, पर्यवेक्षक डी. के. पाटील , कार्यवाह के.बी. वाघमोडे, तंत्रविभाग प्रमुख अविनाश आंबी, माजी मुख्याध्यापक ए. आर. पाटील, आर. ए. पाटील, दिलीप जोशी, महावीर रूग्गे, सुनील पसाले, बी .सी. चिकबीरे, बबन गाताडे,डी. एस. शेळके, डी. एस. कुंभार ,मिलिंद बारवडे, सुधाकर निर्मळे, रमेश पाटील,अकबर पन्हाळकर, पी. ए. पाटील आदीसह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजित लाड यांनी केले.

error: Content is protected !!