शर्यती घेणाऱ्या आयोजकांसह २२ जणांवर गुन्हा दाखल ; दसऱ्यानिमित्त होणार होत्या शर्यती , पो. नि. संजय पतंगे यांची कारवाई

गारगोटी / ता.२६ (आनंद चव्हाण)
      विजयादशमी दसरा सणाच्या निमित्ताने आकुर्डे येथे बैलगाडी शर्यतीचे व पुष्पनगर (ता . भुदरगड ) येथे कुत्र्यांच्या (श्वान) शर्यतीचे आयोजन करणाऱ्या आयोजकांसह शर्यतीत भाग घेणाऱ्या बावीस जणांवर व इतर अज्ञात ५० ते ६० लोकांवर संचारबंदी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणेत आला आहे. भुदरगडचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या या धडाकेबाज कारवाईचे कौतुक होत आहे.
      रविवारी पहाटे सहा वाजणेचे सुमारास दसरा सणाच्या निमित्ताने आकुर्डे रस्त्यावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते, तालुक्यासह बाहेरच्या तालुक्यातील बैलगाडी शर्यतीसाठी आल्या होत्या, रस्त्यावर आयोजक तसेच समर्थक यांची प्रचंड गर्दी झाली होती, भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना ही माहिती मिळाली, ते पोलीस फौज फाट्यासह दाखल झाले, त्यावेळी काहींनी आपल्या दुचाकी तिथेच टाकून पोबारा केला,
     ओंकार जाधव,अक्षय पांडुरंग पाटील, भालचंद्र चौगुले किल्लेदार (रा . गारगोटी ) दयानंद किल्लेदार (रा . गंगापूर ) या चौघा संयोजकांसह शिवाजी बाळू बिडकर (वय ३६ रा अतिग्रे ता हातकणंगले ),विशाल बाजीराव धुंदरे (वय २७ साबळेवाडी,ता करवीर ), किरण रघुनाथ पाटील (वय २७ रा देवाळे, ता करवीर ), पांडुरंग ज्ञानदेव धुंदरे (वय ४४ रा साबळेवाडी ), शुभम भास्कर बाईत , (रा नाधवडे,ता भुदरगड ), पवन हिंदुराव पाटील, (रा कोनवडे ),निशांत दत्तात्रय पाटील (रा . नाधवडे ) या अकरा जणांवर गुन्हा नोंद करणेत आला आहे.तर पुष्पनगर येथे सकाळी दहा वाजणेचे दरम्यान कुत्र्यांच्या शर्यती आयोजित केल्याबद्दल संयोजक प्रसाद सुरेश सुतार, शुभम मोहन शिंदे, ऋषीकेश राजेंद्र पोवार, (रा पुष्पनगर ) व स्पर्धक सचिन विठ्ठल पताडे (रा . बनाचीवाडी,ता राधानगरी ), निशिकांत बाजीराव पाटील, (रा.जाधववाडी,मार्केट यार्ड कोल्हापूर ), व घटनास्थळी वाहन सोडून पळून गेलेले प्रज्योत प्रकाश इंदुलकर, श्रीरंग शिवाजी बाणे, अमित धनाजी सुतार, तानाजी बचाराम अस्वले, संजय दत्तात्रय पोवार, (सर्व रा . पुष्पनगर ), गणेश नामदेव परीट (रा . मडीलगे बुद्रुक ता भुदरगड ) व इतर अज्ञात ५० ते ६० लोकांवर कोरोनाच्या काळात मास्क न लावता गर्दी करून बंदी आदेशाचा भंग करणे, कोरोनाच्या काळात प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाला सहकार्य न करणे, अटी व शर्थीचे उल्लंघन करणे, कोरोनाचा संसर्ग पसरवणेचे घातक कृत्य केल्याबद्दल भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल करणेत आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सतीश बंडा पाटील यांनी दिली असून पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

शर्यती त्या सुध्दा पहाटेच्या सुमारास

सध्या बैलगाडी शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असलेने शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असलेने तालुक्यात अशा शर्यती पहाटेच्या सुमारास घेण्याचा ट्रेंड आला होता,त्यासाठी जिल्ह्यांतून शर्यती साठी बैलगाड्या येत होत्या, त्याच पद्धतीने आज आकुर्डे येथे पहाटेच जिल्ह्यातून बैलगाड्या व त्यांचे समर्थक, शौकीन जमले होते, परंतु आज पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी अशा शर्यतीच्या संयोजकांसह ,बैलगाडी मालकाविरोधात कारवाई केलेने किमान कांही दिवस तरी बैलांचे व कुत्र्यांचे हाल थांबतील असे वाटते,त्यामुळे पशु पक्षी प्रेमीतून समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!