कोरोना बाधितांची संख्या १६६ , समूहसंसर्गामुळे ग्रामस्थांची वाढली चिंता ; जिल्हाधिकाची यांच्या आवाहनाला केराची टोपली …

रुकडी / प्रतिनीधी

      हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावातील कोरोना बाधितांच्या वाढत्या समूह संसर्गाने नागरिकांत भीतीचे वातावरण असून, रुग्ण संख्या १६६ वर पोहोचली आहे . यापैकी ९ बाधितांवर अतिग्रे येथील संजय घोडावत विलगीकरण कक्षात तसेच शहरातील कांही खासगी रुग्णालयात ३ रुग्णांवर तर घरी उपचार २ रुग्णांवर सुरु आहे . यापैकी १४५ जणांना डिस्चार्ज दिला असून कोरोनाने ७ जणांचा बळी गेला आहे. तर शेकडो कोरोना अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे होत असलेल्या समूह संसर्गामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.
     सध्या उपचाराखाली एकूण १४ रुग्ण आहेत. यामध्ये रोज किमान २ ते ५ कोरोना बाधितांची भर पडत आहे. गावांमध्ये कोरोनाचा समूहसंसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक कोरोना दक्षता समितीने गावातील परिसर अंतर्गत स्वच्छतेसह सॅनिटाईज केला आहे. ज्या भागात कोरोनो रुग्ण आढळतील तो परिसर सॅनिटाईज करून प्रतिबंधित करण्यावर भर दिला आहे. समितीचे सदस्य , आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर्स, स्वयंसेवक यांच्या माध्यमातून घरोघरी जावून कोरोनाचे गांभीर्य व आपली जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. आरोग्य विभागाने संशयित कोरोना रुग्णाला तातडीने आरोग्यसेवा उपलब्ध करुन दिली जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानूसार ‘ माझे कुटूंब व माझी जबाबदारी ‘ या संकल्पनेचे गांभीर्य व महत्त्व ओळखून ग्रामपंचायतीने जनजागृती चालु केली आहे . मात्र ग्रामस्थांमध्ये याचे गाभीर्य दिसुन येत नाही. रस्त्यावर विनाकारण गर्दी करुन थांबणे , बाहेर पडताना मास्क न वापरणे , सोशल डिस्टंसींग न पाळणे आदी राजरोस पणे सुरू आहे .

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मास्क नाही. प्रवेश नाही . वस्तुही नाही . असे आवाहन केले आहे. मात्र रुकडीतील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाची यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवलेली दिसुन येत आहे .

error: Content is protected !!