घोडावत पॉलिटेक्निकचे प्रा. सचिन कांबळे यांना सन्मान पुरस्कार जाहीर …

हातकणंगले / प्रतिनिधी

    अतिग्रे ( ता. हातकणंगले ) येथील संजय घोडावत पॉलिटेक्निकचे प्रा. सचिन कांबळे यांना दिल्ली नवोदित साहित्यकार मंच व सोसायटी फॉर यूथ डेव्हलपमेंट या संस्थेकडुन महात्मा ज्योतिबा फुले सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे . हा पुरस्कार सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेबद्दल देण्यात येतो. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात येते .
   कोल्हापूर जिल्ह्यातील साजणी गावचे सुपुत्र कवी व लेखक प्रा. सचिन कांबळे हे संजय घोडावत पॉलिटेक्निक अतिग्रेमध्ये रसायनशास्त्र विभागात कार्यरत असुन महाराष्ट्र व कर्नाटकच्या युवा बौद्ध धम्म परिषदचे कोल्हापूर जिल्हा संघटक व साहित्यानंद प्रतिष्ठानचे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत . त्यांनी या संघटनेच्या व संस्थाच्या माध्यमातुन सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे . हा पुरस्कार जाहीर झाल्याने समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. संजय घोडावत विद्यापीठचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!