डेक्कन इंग्लिश स्कूल व श्री. ग. दा. कुलकर्णी मराठी विद्यामंदिर येथे स्वातंत्र्य दिन साजरा

इचलकरंजी /ता. १५  

         श्री. लक्ष्मी वेंकटेश एज्युकेशन सोसायटीच्या डेक्कन इंग्लिश स्कूल व श्री गजानन दाजी कुलकर्णी मराठी विद्यामंदिर मध्ये आज 74 वा स्वातंत्र्य दिन सोशल डिस्टन्स ठेवुन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण समारंभ उदय कुलकर्णी तथा बापू तारदाळकर यांच्या हस्ते झाला .
         याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुरेश जी. जोशी , हेमंत कुलकर्णी , निलेश कुलकर्णी , विश्राम कुलकर्णी , शेखर कुलकर्णी , दिगंबर कुलकर्णी ,कौस्तुभ दातार , प्रवीण सावळजकर , तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची कुलकर्णी व सौ . सरिता बंडगर, शिक्षक व शिक्षकेतर अन्य कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!