येथील महेश सेवा समिती आणि डॉ. हेडगेवार हॉस्पिटल संचालित कोविड केअर सेंटर मध्ये वीर रेस्क्यु फोर्स यांच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला . स्वातंत्र्यदिन कार्यक्रम “राष्ट्रगीत आणि झेंडागीताने संपन्न झाला . यावेळी शासनाचे सर्व नियमांचे पालन , सामाजिक अंतर व मास्कचा वापर सर्वांनी केला होता. कार्यक्रमासाठी रुग्णांनाही उपस्थित राहणेस परवानगी दिली असल्याने रूग्णांचा आनंद ओसडुंन वाहत होता. हा उपक्रम राज्यात पहिलाच असण्याची शक्यता आहे . कार्यक्रमाचे नियोजन वीर रिस्क्यू फोर्सचे जवान व सामाजिक कार्यकर्ते मंगेश प्रकाश बावचे, सुनिल कांदेकर, प्रथमेश कांबळे, सनी कोठावळे आदीनी केले होते .