हातकणंगले येथील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम तहसिलदार प्रदीप उबाळे यांच्या हस्ते संपन्न

हातकणंगले /ता.१५

           हातकणंगले येथील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम तहसिलदार प्रदीप उबाळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला . कार्यक्रमास जेष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले , पंचायत समितीचे सभापती महेश पाटील, पोलीस उपअधिक्षक प्रणील गिल्डा, गटविकास आधिकारी अरुण जाधव ,हातकणंगले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश कदम, निवासी नायब तहसीलदार दिगंबर सानप , निवडणूक नायब तहसीलदार, शोभा कोळी , सर्व सरकारी विभागाचे अधिकारी , कर्मचारी, पोलीस कर्मचारी , नागरिक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते . कोरोनाच्या पार्श्वभुमीवर दरवर्षी विद्यार्थ्यांची कवायत व सादर होणारा संचलनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता . ध्वजारोहन कार्यक्रम शासकीय आदेशाचे पालन करून सोशल डिस्टंन्स ठेवुन मास्कचा वापर करून संपन्न झाला .

error: Content is protected !!