बाळासाहेब पाटील ( दादा ) हायस्कूल आणि भाऊसो चौगुले बाल विद्यामंदिर प्रशालेचा ध्वजारोहण अविनाश मजलेकर यांच्या हस्ते

हातकणंगले/ता.१५ -प्रतिनिधी

        आळते (ता.हातकणंगले) येथील जनसेवा शिक्षण प्रसारक मंडळ आळते संचलित , बाळासाहेब पाटील ( दादा ) हायस्कूल आणि भाऊसो चौगुले बाल विद्यामंदिर या संयुक्त प्रशालेचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. ध्वजारोहण संस्थेचे सचिव श्री. अविनाश मजलेकर यांच्या हस्ते झाले.
          कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन श्री संजयकुमार पाटील , व्हाईस चेअरमन श्री दादासो चौगुले, संचालक अमित पाटील , बबन चौगुले , आण्णासो आवटे, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ . ए.ए. उळागड्डे , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. तेजस्विनी पाटील, दोन्ही विभागाचे शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!