आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज मिणचे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न ;ध्वजारोहण प्राचार्य डी. एस. घुगरे यांच्या हस्ते

वडगांव /ता .१५- प्रतिनिधी

       मिणचे (ता . हातकणंगले) येथील स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन ॲण्ड ज्युनियर कॉलेज येथे स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात संपन्न झाला . संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य श्री.डी. एस. घुगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य श्री एम ए परीट यांनी केले .
         डी. एस. घुगरे म्हणाले , कोरोना सारख्या महामारीला आपण सर्वजण धैर्याने सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहोत . आपण नक्कीच कोरोना विरुद्धची ही लढाई एकमेकांच्या सहकार्याने जिंकणारच आहोत . मात्र हे करत असताना प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका समाजामध्ये राबविण्याचे महत्त्वाचे काम शिक्षक म्हणून तुम्हाआम्हा सर्वांची जबाबदारी आहे . आपण ती निष्ठेने पार पाडतच आहोत . मात्र आणखी निष्ठेने पार पाडण्याची जबाबदारी स्वातंत्र्यदिनी आपण सर्वांनी खांद्यावर घ्यावी . शाळेच्या प्रांगणात मुलांच्या किलबिलाटाने आणि उत्साहाने भरलेला स्वातंत्र्यदिन सोहळा आज आपण पाहू शकत नाही . याची मनामध्ये निश्चितच खंत जाणवत आहे . तरी देखील मुलांच्याविना पार पडत असणाऱ्या स्वातंत्र्यदिनी आपण आपल्या चिमुकल्याच्या उज्वल भविष्यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहू . अशा निश्चय करून सर्व मुलांना मनोमन शुभेच्छा देवून , भारतीय संशोधकाच्या प्रयत्नांना निश्चितच यश येईल व कोरोना विरोधची लस लवकरच बाजारात येईल . असा आशावाद व्यक्त करत भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी आपल्या मनोगताला पूर्णविराम दिला .
         याप्रसंगी 2028 च्या ऑलिंपिक स्पर्धेच्या तयारीकरीता भारतीय खेळ प्राधिकरण विभागाकडून शाळेचा आर्चरी खेळाडू मयूर रोकडे यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
         आदर्श शिक्षण संकुलातील दीपक शेटे व शिवाजी पाटील या सहाय्यक शिक्षकांच्या प्रयत्नातून आज स्टार अकॅडमी डिजिटल न्यूज या ब्लॉगचे उद्घाटन डी . एस . घुगरे ,एम ए परीट आदि मान्यवरांच्या शुभ हस्ते झाले . या न्यूज चॅनलला मान्यवरांनी व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिमखाना विभाग प्रमुख श्री शिवाजी पाटील यांनी केले . तर आभार सौ. प्रियांका पवार यांनी मानले.

error: Content is protected !!