सेनापती कापशी / वार्ताहर kagal news
सृष्टीवर बदल घडवायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने प्रथम स्वतः मध्ये बदल घडविला पाहिजे. असे भावपूर्ण उदगार बी. के.कविता बहीणजी यांनी व्यक्त केले. कापशी (ता. कागल) येथे पिताश्री ब्रम्हाबाबा यांच्या 52व्या स्मृतिदिना निमित्य बोलत होत्या. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उमेश देसाई, राजाभाऊ माळी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी पिताश्री या चरित्र मधून आपले विचार सर्वांपुढे मांडले. ईश्वरीय प्रजापिता विश्व विद्यालय 1936 साली सुरु झाले असून जगभरात आता जवळपास 140 ठिकाणी ही विद्यालये सुरु आहेत. एका छोट्या रोपट्याचे आता वटवृक्ष झाला आहे. ही आपल्या सर्वासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सध्याचे जग 21व्या शतकात पोहचले असून तंत्र ज्ञानाच्या धाव पळीत आहे. त्यामुळे समाजातील प्रेम, बंधुभाव, आपुलकी लोप पावत चालली आहे. यासाठी ईश्वरीय प्रजापिताच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर सुख, शांती मिळावी. म्हणून काम करीत आहोत. यावेळी महिला वर्गाची उपस्थिती मोठी होती.
यावेळी उमेश देसाई, राजाभाऊ माळी यांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमास संभाजी पाटील, मकरंद कोळी, सर्पमित्र बाळकृष्ण देसाई, अन्य मान्यवर व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शेवटी प्रियांकाबेहन यांनी आभार मानले.