कोल्हापूर/ प्रतिनिधी

संजय घोडावत पॉलीटेक्निकचे sanjay ghodawat polytechnic इलेकट्रीकल इंजिनीरिंग विभागाचे प्रा.नितीन सुधीर जाधव यांना देवदान बहूउद्देशीय सेवाभावी संस्था, कुपवाड-सांगली या संस्थेतर्फे २०२० या वर्षाचा ”राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला. प्रा.नितीन जाधव यांनी सपत्नीक हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराचे वितरण सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सुनील मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रा.शरद पाटील, देवदान चे संस्थापक श्री. अनिल मोहिते, प्रा.अजिंक्य मोहिते व आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल संजय घोडावत पॉलीटेक्निकमार्फत प्राचार्य विराट गिरी यांच्या हस्ते ही त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अकॅडमिक डीन प्रा.नितीन पाटील व प्रा.संदीप वाटेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.नितीन जाधव यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
प्रा.जाधव हे चोकाक गावचे असून सुरुवातीपासूनच त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड आहे मग ते गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करणे, गरजूला,समाजातील उपेक्षित घटकांना मदत, इत्यादी विविध कामे त्यांच्या सामाजिक कार्याचा संदेश देतात. त्यांनी एम जी युथ फौंडेशन च्या माध्यमातून रुकडी परिसरात महापूर व कोरोना च्या संकटामध्ये सामाजिक भान जपून गरजूना मदत केली आहे. ते एक करिअर समुपदेशक असून त्यांनी समुपदेशित केलेली हजारो विद्यार्थी आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.
प्रा. जाधव यांचे शिक्षण एम टेक.पॉवर सिस्टिम असून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकेमध्ये आपले शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत.
या पुस्काराबाबत बोलताना प्रा. जाधव म्हणाले ” शिक्षणामुळे माणूस समृद्ध बनतो म्हणून मी या क्षेत्राकडे वळलो. ज्ञानदानासारखे पवित्र या जगात काहीच नाही. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. या पुरस्काराचे श्रेय मी माझे दिवंगत वडील सुधीर जाधव, आई मंगल, पत्नी केतकी तसेच एसजीपी मॅनेजमेंट व माझे सहकारी मित्र यांना देतो.”
या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री. संजयजी घोडावत, विश्वस्त श्री. विनायक भोसले व संजय घोडावत पॉलीटेकनिक चे प्राचार्य श्री.विराट गिरी यांनी ही त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.