श्री लक्ष्मी व्यंकटेश एज्युकेशन सोसायटीच्या डेक्कन इंग्लिश स्कूल मध्ये ७१वा प्रजासत्ताक दिनाचा (republic-day) कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात अँड.स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश जोशी, उपाध्यक्ष श्री हेमंत कुलकर्णी, श्री निलेश कुलकर्णी, श्री विश्राम कुलकर्णी ,श्री शेखर कुलकर्णी ,श्री दिगंबर कुलकर्णी, श्री कौस्तुभ दातार, श्री प्रवीण सावळजकर, मुख्याध्यापिका सौ.प्राची कुलकर्णी, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.