नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने वृक्षारोपण

हातकणंगले /ता. १५

स्वातंत्र्यदिनचे औचित्य साधून नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या हातकणंगले तालुका कार्यकारिणीच्या वतीने हातकणंगले येथील लक्ष्मी मंदिर परिसरात मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी , अक्षय जाधव, हातकणंगलेचे नगरसेवक राजू इंगवले, नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिस मुजावर, तालुका अध्यक्ष पत्रकार आकाश शिंदे, उपाध्यक्ष दत्ता कोळी, कोषाध्यक्ष स्वप्नील करडे, समन्वयक विष्णू लोखंडे, दीपक हिले, कुमार गोसावी आदी मान्यवरउपस्थित होते.

error: Content is protected !!