चंदूर येथे स्वातंत्र्य दिन साधेपणाने पण उत्साहात साजरा

चंदूर /ता .१६-प्रतिनिधी

          चंदूर (ता. हातकणंगले ) येथे कोरोना प्रादूर्भावामुळे स्वांतत्र्य दिन साधेपणाने सोशल डिस्टन्स ठेवुन व मास्कचा वापर करून फोटो पुजन व ध्वजारोहण साजरा करणेत आला. चंदूर ग्रामपंचायतीमध्ये फोटो पूजन महीला कर्मचारी सौ. सुनिता पवार तर ध्वजारोहण प्रशासक सरपंच नारायण रामाण्णा यांच्या हस्ते झाले.

         कुमार कन्या विद्यामंदीर मध्ये फोटो पूजन शाळा समिती अध्यक्ष भाऊसो कुभार , वध्वजारोहण ग्रामविकास अधिकारी बी. व्ही. कांबळे यांच्या हस्ते झाले . यावेळी मुख्याध्यापक नाईक ग्रामपंचायतीचे कर्मचारी. शिक्षक , शिक्षिका उपस्थित होते .गावचावडीमध्ये फोटो पूजन व ध्वजारोहण तलाठी सौ . सुषमा धुत्रे यांच्या हस्ते झाले . यावेळी कोतवाल राजू पुजारी, रोहीत. जयाकिसान सोसायटी मध्ये फोटो पूजन संचालक बळीराम कदम, ध्वजारोहण महादेव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जवाहर कारखान्याचे संचालक बसगोंडा पाटील , सेक्रेटरी गोरख पाटील , संचालक . अरूण सोसायटी ध्वजारोहण सेक्रेटरी जयवंत राणे यांच्या हस्ते झाला . 

          यावेळी दत्त कारखान्याचे संचालक रघुनाथ पाटील व संस्थेचे संचालक. विदयार्थी युवक संघटना फोटो पूजन संचालक रविंद्र झेले, ध्वजारोहण विजय पाटील. बिरदेव डेअरी फोटो पूजन व ध्वजारोहण गजानन पाटील यावेळी उपस्थिती संस्थचे चेअरमन मारुती पुजारी व सर्व सदस्य. महासिध्द डेअरी ध्वजारोहण माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब वाघमोडे ,राधाकृष्ण मंदिर ध्वजारोहण माजी उपसरपंच रामा पुजारी यांच्या हस्ते झाले .यावेळ महासिध्द डेअरीचे संस्थापक नागेश पुजारी उपस्थित होते . 

error: Content is protected !!