रुकडी / प्रतिनिधी
येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने कै.संभाजीराव माने स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा गुरुवार दिनांक ७ जानेवारी २०२१ रोजी सकाळी नऊ वाजता रुकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केली आहे.
या स्पर्धेतील विषय पुढील प्रमाणे १. आण्णाभाऊ साठेः साहित्य आणि समाजकार्य , 2.कोव्हीड १९ आणि भारतीय अर्थव्यवस्था , ३. कुस्तीतील ध्रुवताराः हिंदकेसरी श्रीपतराव खंचनाळे , ४.नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण , ५. गुगल-एक वैश्विक महागुरू असे स्पर्धेसाठी विषय असून प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये ५०००/-, प्रमाणपत्र व कै.संभाजीराव माने स्मरणार्थ कायमस्वरूपी ट्राॕफी , द्वितीय क्रमांक रोख रुपये ३००० व प्रमाणपत्र , तृतीय क्रमांक रोख रुपये २०००/- व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ रोख रुपये १००० व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.
तरी ज्युनियर सिनियर व पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे व स्पर्धा समन्वयक प्रशांत कांबळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 7775989677 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा .