दोन फेब्रुवारीला सांगलीत रक्तदान शिबीर

सांगली / प्रतिनिधी blood donation
  उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सांगली शहर, खाकी बिरादरी व ह्यूमन राइट जस्टिस असोसिएशनच्या वतीने दोन फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 2 या वेेेळेत कृष्णा मैरिज हॉल येथे रक्तदानाचे आयोजन केले आहे.

  खाकी बिरादरी पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कार्यरत आहे. कोरोना काळात रक्त टंचाई होती. सामान्य रुग्णाना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागते . शासनाने रक्तदानाचे आवाहन केले आहे. सामाजिक बंधिलकी लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी, ह्युमन राइट जस्टिस असोसिएशन व खाकी बिरादरी तर्फे शिबिर आयोजित केले आहे. तरी तरुण – तरुणीनी रक्तदान करावे . असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!