आर्मीतील तरुणाला दीड लाखाचा गंडा ; उड चलो वेबसाईट वरून ऑनलाईन फसवणूक

कोल्हापूर / प्रतिनिधी

      उड चलो नावाच्या ऑनलाईन वेबसाईट वरून विमानाचे तिकीट बुकिंग केलेल्या आर्मीतील तरुणाची दीड लाखाची फसवणुक केलेची घटना घडली आहे . चंद्रकांत आप्पासो मगदूम (वय वर्ष -२५ , रा . बाचणी ता . कागल जि. कोल्हापूर ) असे फसवणूक झालेल्या आर्मीतील युवकाचे नाव असून याबाबतची फिर्याद कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्यात दिली आहे . पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत .
       याबाबतची अधिक माहिती अशी की , कागल तालुक्यातील बाचणी येथील आर्मीतील तरुण चंद्रकांत मगदूम यांनी उड चलो नावाच्या वेबसाइटवरून ऑनलाइन विमानाच्या तिकिटाचे बुकिंग केले होते . त्या तिकिटाची पुढील तारीख वाढवून घेण्यासाठी गुगलवरून उड चलो कस्टमर केअरवर असलेल्या 9883542734 या मोबाईल नंबरवर फोन केला . या नंबरवरून रिमोट अॅक्सेसिबल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले . त्यावरून मोबाईल मधील गोपनीय व अनधिकृतपणे सिस्टम कॅच करून घेतली . व त्याआधारे मगदूम यांच्या एसबीआयच्या खात्यातील दीड लाख रक्कम काढून घेऊन ऑनलाइन फसवणूक केलेची घटना घडली आहे .

error: Content is protected !!