बोलेरोच्या धडकेत एकजण ठार

नवे पारगाव /ता.१८: प्रतिनिधी

     वाठार – वारणानगर राज्यमार्गावरील  नवे पारगाव (ता.हातकणंगले) येथील दत्त पतसंस्थेसमोर झालेल्या अपघातात सायकल स्वार राजाराम गणपती लोहार (वय ५७,रा.पाडळी) हा ठार झाला. हा अपघात मंगळवारी झाला असुन घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.
       याबाबत वडगाव पोलीसांतुन मिळालेली माहिती अशी कि, राजाराम लोहार हे सायकलवरून नवे पारगाव येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये कामावर जात होते. तळसंदेहुन वारणानगरच्या दिशेने जाणारी बोलेरो (क्र.एम.एच.११ए.के.२५११) गाडीने सायकलस्वार राजाराम लोहार याना जोरदार धडक दिली.यामध्ये ते गंभीर जखमी झाले.त्यांना महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.अपघाताचे वृत्त समजताच पाडळी गावावर शोककळा पसरली.नवे पारगावच्या ग्रामीण रुग्णालयात वैदयकिय अधिकारी अनिता शहा यांनी उत्तरीय तपासणी केली.वडगाव पोलीस ठाण्याचे  सहा.फौजदार अशोक नेर्ले व हे.कॉ.अमर पावरा अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!