वारणानगर /प्रतिनिधी
आरळे (ता.पन्हाळा) येथून मामाच्या घरातुन अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवुन नेले प्रकरणी तिघांचे विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे . अक्षय चंद्रकांत नांगरे, साहिल चंद्रकांत नांगरे व अमर साळवी (सर्वजण रा.आरळे, ता.पन्हाळा) अशी तिघांची नांवे असुन याबाबतची फिर्याद अल्पवयीन मुलीचे मामा सागर बुधाजी महापुरे यानी कोडोली पोलिसात दिली आहे.
या बाबत कोडोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ,चोकाक (ता.हातकणंगले ) येथे राहणारी अल्पवयीन मुलगी आरळे येथे मामा सागर महापुरे यांच्या घरी आली होती. मुलगी अल्पवयीन आहे . हे माहीत असताना सुद्धा मागील मंगळवारी दि.२९ सप्टे.रोजी सकाळी ६.३० वा.पूर्वी घराच्या मागील दारातून बोलावून फूस लावुन पळवुन नेले . म्हणून या तिघांचे विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पो.हे.कॉ.चिले,पो.ना.सुतार करत आहेत.