नदीवरील बंधाऱ्याचा भराव खचला ; त्वरीत डागडूजी करण्याची मागणी

रुकडी /प्रतिनिधी
    रुकडी ( ता. हातकणंगले ) येथील पंचगंगा नदीवर रुकडी-चिंचवाड गांधीनगर दरम्यान असणाऱ्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचा भराव खचला असून, दगडी पॅचवर्क निखळले आहे. तसेच ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने या बंधाऱ्याची त्वरीत डागडुजी करावी . अशी मागणी रुकडी, तसेच चिंचवाड ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

  रुकडी-चिंचवाड दरम्यान पंचगंगा नदीवर कोल्हापूर पध्दतीचा बंधारा आहे. पावसाळ्यात गेल्या तीन महिन्यात चार ते पाच वेळा पुराच्या पाण्याखाली गेलेल्या या बंधाऱ्याची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे. सततच्या पुरामुळे बंधाऱ्याला लागून असणारा भराव खचला असून, दगडी पॅचवर्क थोडया प्रमाणात निखळले आहे. तसेच बंधाऱ्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.तसेच पावसाळयात पुराने वाहुन आलेला कचरा बंधाऱ्यात साठून राहिला आहे बंधाऱ्यावरुन कायमस्वरूपी दुचाकीस्वारांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असते. बंधाऱ्याच्या मोठ्या दुरावस्थेमुळे पादचारी तसेच वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय व कुचंबणा होत आहे .
   त्यामूळे संबंधित पाटबंधारे खात्याने याविषयी त्वरीत दखल घेऊन, या बंधाऱ्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवून बंधा-याला लागून असणारा भराव तसेच दगडी पॅचवर्क भक्कम करावे . अशी मागणी रुकडी तसेच चिंचवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच वाहन धारकातून व्यक्त केली जात आहे .

   रुकडी-चिंचवाड दरम्यानच्या पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावर पडलेले मोठमोठे खड्डे. तर दुसऱ्या छायाचित्रात बंधा-याचा खचलेला भराव दिसत आहे

.( छाया: सर्जेराव कांबळे , रुकडी. )

error: Content is protected !!