हातकणंगले तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी नऊ फेब्रुवारीला होणार

हातकणंगले /प्रतिनिधी
    जानेवारी महिन्यात पंचवार्षिक निवडणुका झालेल्या हातकणंगले तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी नऊ फेब्रुवारी रोजी होणार असुन याबाबतचा अद्यादेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशान्वये प्रभारी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी तहसिलदार प्रदिप उबाळे याना पारित केला आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतींच्या सभा अध्यक्षांच्या नियुक्त्या निवडणुक विभागाने केल्या असुन याबाबतच्या सुचना संबंधीत ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
   तालुक्यात २१ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर २० ग्रामपंचायतींच्या निवडणुका मोठ्या धामधुमित पार पडल्या तर एका ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध झाली. सरपंच पदावरून घोडेबाजार होऊ नये म्हणुन निवडणुकीनंतर सरपंच पदांची आरक्षणे टाकण्यात आली. त्यानुसार नऊ फेबुवारीस २१ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी केल्या जाणार आहेत. यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित सर्व सदस्यांची पहिली सभा होईल व निवडुन आलेल्या सदस्या पैकी दोन सदस्यांची सरपंच व उपसरपंच म्हणुन बहुमतानी निवड केली जाईल. यामध्ये १२ महिला तर ९ पुरुष सरपंच असणार आहेत.यानंतर संबंधीत पदाधिकाऱ्यांना गावगाडा हाकण्यासाठी अधिकार प्राप्त होतील.
   निवडणुक विभागाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सदरची सभा होईल .या सभेचे इतिवृत्त तयार करून निवडणुक विभागाला सादर करावेत असे आदेश तहसिलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी प्रदिप उबाळे यानी संबंधीताना दिले.आहेत. नऊ फेब्रुवारीस सरपंच निवडी होणाऱ्या ग्रामपंचायती व सरपंचपदांची गावनिहाय्य आरक्षणे अशी,चार गाव अनुसूचित जाती साठी आरक्षणे निश्चित करण्यात आली असुन यामध्ये किणी, चंदुर व कबनुर या तीन गावात स्त्रिया सरपंच होणार आहेत. तर वाठार तर्फ वडगाव या एका गावात पुरुष सरपंच होणार आहे.
  नागरीकांच्या मागास प्रवर्गाच्या सरपंच पदासाठी पाच ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या असुन यामध्ये रुई , दुर्गेवाडी,हालोंडी या तीन गावात स्त्रिया सरपंच होणार आहेत. तर नेज,तासगाव या दोन गावात पुरूष सरपंच होणार आहेत.
सर्वसाधारण प्रवर्गाच्या सरपंच पदासाठी बारा ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या असुन माणगाववाडी,बिरदेववाडी, कुंभोज,पाडळी,मिणचे,व वठार तर्फ उदगाव, या सहा ग्रामपंचायती मध्ये स्त्रिया सरपंच होणार आहेत. तर माणगाव , तिळवणी, जंगमवाडी, मनपाडळे, खोची, लाटवडे या सहा गावात पुरुष सरपंच होणार आहेत. याप्रमाणे नुतन सरपंच निवडले जाणार आहेत. सरपंच पदाच्या निवडीसाठी व बहुमताच्या गोळाबेरीज करण्यासाठी नेते मंडळीनी चांगलीच कंबर कसली असुन कोणी सदस्य फुटु नये याची दक्षता घेतली जात आहे.

error: Content is protected !!