विनय कोरे करिअर ॲकॅडमीचा सातवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

वारणानगर / प्रतिनिधी
     येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर संचलित विनय कोरे करिअर ॲकॅडमीचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी चालवलेल्या या अॅकॅडमीमध्ये अभ्यासाला असणाऱ्या विद्यार्थ्यानी रांगोळी, चित्रे, पेंटिंग, गायन-वादन, क्रीडा स्पर्धा मध्ये सहभाग नोंदवत मनावरचा ताण हलका केला. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आ. डॉ. विनय कोरे (सावकर ), प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी वर्धापन दिनास शुभेच्छा दिल्या. समारंभ संयोजन डॉ. ए. आर. भूसनर यांनी केले. अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य प्रा डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.

वारणानगर येथील विनय कोरे करिअर अकॅडमी च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्र. प्राचार्य प्रा. डाॅ. प्रकाश चिकुर्डेकर. सोबत समन्वयक डॉ. एस. आर. भुसणर. माजी उपप्राचार्य के. जी. जाधव, प्रा. एस. आर कुलकर्णी.

      समारंभात डॉ. चिकुर्डेकर म्हणाले की, “स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी मनावरील ताण कमी करण्याची गरज आहे. संयम, नैतिक मूल्यांची जपणूक , सातत्यपूर्ण अभ्यास, धेय्या प्रती निष्ठा आणि बोलण्यातील कौशल्याच्या जोरावर येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत वारणा खोऱ्यातील विद्यार्थी निश्चित यश संपादन करतील. असा विश्वास त्यांनी या वेळेला व्यक्त केला. अल्पकाळात ७० हून अधिक विद्यार्थी राज्य आणि देशसेवेत पोहचले असल्याचा अभिमान असून अत्यंत कठीण परिस्थितीमध्येही कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केल्याचे ही त्यांनी सांगितले
     प्रा. के.जी. जाधव, प्रा. एस. आर. कुलकर्णी यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून ‘स्पर्धेत उतरणार्‍या भावी अधिकाऱ्यांनी शिस्त, संयमाच्या जोरावर यश खेचून आणण्याचे आवाहन केले.’
     प्रारंभी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रे- पेंटिंग, रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन प्र. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते झाले. स्वागत प्रास्ताविक समन्वयक डॉ. ए. आर. भुसनर यांनी केले. सूरज वाघ यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत- बासरी वादनाने समारंभाचा शुभारंभ झाला.
    यावेळी अकॅडमीतील १५० हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींसह प्रा. अशोक चव्हाण, प्रा. संतोष कांबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. पियुषा मगदूम हिने केले. आभार अजित खोत यांनी मानले.

error: Content is protected !!