आम.आवळे व डॉ.गोरड यांचा मौजे वडगाव येथे सत्कार

हेरले / प्रतिनिधी
     मौजे वडगाव ( ता. हातकणंगले) येथे संजय गांधी नियोजन कमिटी मौजे वडगाव यांच्यावतीने आम. राजूबाबा आवळे यांची संजय गांधी निराधार कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व डॉ . विजय गोरड यांची सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

आमदार राजूबाबा आवळे यांचा  सत्कार बाळासो सावंत व डॉ. विजय गोरड यांचा सत्कार भगवान कांबळे यांच्या हस्ते करतांना शेजारी अन्य मान्यवर.

    यावेळी हेरले मंडल आधिकारी भरत जाधव , तलाठी एस.ए. बरगाले, लोकनियुक्त सरपंच काशिनाथ कांबळे. माजी उपसरपंच किरण चौगुले , तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश कांबरे ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील, सुनिल खारेपाटणे, माजी पोलीस पाटील मनोहर चौगुले, शितल परमाज,संजय जंगम, संतोष सावंत, कृष्णा सावंत, बाळासो सावंत, सुनील गरड, मारुती शेंडगे आदी मान्यवरांसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार भगवान कांबळे यांनी मानले.

error: Content is protected !!