धोकादायक विजेची तार अन्यत्र शिफ्ट करावी ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

इचलकरंजी / प्रतिनिधी
    दत्तनगर परिसरातील धोकादायक विजेची तार अन्यत्र शिफ्ट करावी . अशी मागणी इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा नगरसेवक नितीन जांभळे व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बंडोपंत मुसळे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांचेकडे निवेदनाद्वारे केली. गांभीर्य ओळखून शेट्टी यांनी तातडीने महावितरणच्या अधिकारी यांना बोलावून तात्काळ काम मार्गी लावण्याचे आदेश दिले.

   मागील आठवड्यात धोकादायक विजेच्या तारांचा स्पर्श होऊन विजेच्या धक्याने मृत्यु झालेल्या दत्तनगर शहापुर परिसरातील प्रेम कांबळे या शाळकरी मुलाच्या कुटुंबियांची माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी नितीन जांभळे यांनी त्यांची भेट घेऊन माहिती दिली. या परिसरातून 33 केव्हीची विजेची लाइन गेली आहे. ती बहुतांशी घरावरुन गेली असल्याने नागरिकांच्या जीवाला सातत्याने धोका संभवतो. यापुर्वीही अशा घटना घडल्या असून सदैव नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. त्यासाठी ही विजेची तार अन्यत्र शिफ्ट करून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी केली.
   यावेळी शेट्टी यांनी कांबळे कुटुंबियांचेसांत्वन करून शासन स्तरावरुन जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ अशी ग्वाही दिली. याप्रसंगी राजू खोत, सुनिल शिंदे, अमोल भाटले, कय्यूम डांगे, प्रमोद वेटाळे, रहीम डांगे, गुडडू शेख, अनिकेत गुरसाळे यांच्यासह भागातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!