मटका घेताना पाच जणांना अटक

वारणानगर /प्रतिनिधी
   वाडीरत्नगिरी- जोतिबा डोंगर ( ता. पन्हाळा) येथे मटका घेत असल्याच्या कारणावरून पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून जुगार साहित्याच्या मुद्देमालासह सुमारे रू.१५,७५५/- किंमतीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. प्रकाश  विष्णू बुचडे (वय३०),अनिकेत बळवंत कदम (दोघेही रा.यवलुज ता.पन्हाळा) गोविंद बाळू सांगळे (वय २५),रमेश सूर्यकांत बुने (वय ४०),संकल्प धावजी मिटके (वय २६) (सर्व रा.वाडीरत्नगिरी-जोतीबा, ता.पन्हाळा) यांच्या विरुद्ध कोडोली पोलिसात गुन्हा दाखल करणेत आला आहे .
   याबाबत कोडोली पोलिसांतुन मिळालेली माहिती अशी,ठाकरे-मिटके गल्लीतील संकल्प धावजी मिटके यांच्या घरात मटका घेत असल्याची माहिती मिळाल्यावर तेथे पोलिसांनी धाड टाकली असता कमिशनवर मटका घेत असल्याचे लक्षात आले.त्यांच्या जवळ मुंबई मटका जुगाराच्या आकडे लिहलेल्या  पिवळ्या रंगाच्या चिठ्या, मोबाईल हँडसेट व रोख रक्कम असा रू.१५,७५५ चे मुद्देमालासह  साहित्य जप्त करून वरील पाच जणांना अटक केली.पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे पो.काॅ.पाटील करत आहेत.

error: Content is protected !!