अविश्वास दाखविणारा अध्यादेश तात्काळ रद्द करावा

पेठवडगांव / मिलींद बारवडे
    राज्यातील शिक्षक ऑनलाईन अध्यापना बरोबरच कोरोना आपत्ती व्यवस्थापनातील सहाय्यता कक्ष, माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत विविध सर्वेक्षण करत असताना ऑनलाईन अध्ययन- अध्यापनाची साप्ताहिक माहिती लिंकवर भरावी. असा शिक्षकांच्यावर अविश्वास दाखवणारा काढलेला अध्यादेश तात्काळ रद्द करावा .अन्यथा या प्रक्रियेवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, महिला शिक्षक जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे
     निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड, शिक्षण आयुक्त पुणे, शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचलनालय पुणे, यांना पाठवले आहे .
     निवेदनात पुढे म्हटले आहे की , ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये . म्हणून शाळा बंद शिक्षण सुरु या उपक्रमाअंतर्गत राज्यातील शिक्षक ऑनलाईन अध्यापन करत आहेत. विद्यार्थ्यांना व्हाटसअप् च्या माध्यमातून ग्रुप तयार करून त्यांना अभ्यास देणे . तपासणेही चालू आहे. विविध शैक्षणिक उपक्रम सुरु असताना शिक्षक शासनाच्या आदेशानुसार कोरोना जनजागृती बाबतच्या कामकाजात हि कार्यरत आहेत.राज्यातील अनेक शिक्षकांना कोरोनाचा संसर्गही झाला आहे.
   शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना कोरोनाच्या कामकाजातून कार्यमुक्त करणेबाबत आदेश काढून शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या स्थानिक प्रशासनाला सूचनाही दिल्या आहेत. मात्र अद्यापही शिक्षकांना कार्यमुक्त तर करण्यात आलेले नाही . तरीही शिक्षक कोरोना आपत्तीचे व अध्यापनाचे काम करत आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
    अशा परिस्थितीत ऑनलाईन साप्ताहिक माहिती भरण्या संदर्भात शासनाने परिपत्रक काढला आहे. लिंकवर माहिती भरण्यासाठी सर्व्हर डाऊन होऊन माहिती अपलोड होण्यासाठी वेळ वाया जाणार आहे. शिक्षकांना याचा मनस्ताप होणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्यात असंतोष निर्माण झाला असून हा अध्यादेश शासनाने तात्काळ रद्द करावा . अन्यथा कामावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
    निवेदनावर मोहन भोसले, एन वाय पाटील, जनार्दन निऊंगरे, रघुनाथ खोत,सुनील पाटील, बाळकृष्ण हळदकर, दुन्देश खामकर,अरुण चाळके, किरण शिंदे ,रोहिणी लोकरे , प्राजक्ता जाधव ,नूतन सकट , वैशाली कोंडेकर ,मीना चव्हाण , विद्या चव्हाण यांच्या सह्या आहेत.

error: Content is protected !!