हातकणंगले नगरपंचायत साठी शववाहिका आणि रुग्णवाहिका मिळावी ; माणुसकी फोंडेशनचे आम. राजुबाबा आवळेना निवेदन …..

हातकणंगले / प्रतिनिधी
  हातकणंगले नगरपंचायतीसाठी शववाहिका आणि रुग्णवाहिका मिळावी . यासाठी माणुसकी फोंडेशन यांच्याकडून हातकणंगले मतदारसंघचे आमदार राजूबाबा आवळे यांना निवेदन देण्यात आले.
  यावेळी बोलताना माणुसकी फोंडेशनचे सागर नलवडे, सचिन कुंभार, सचिन बोराडे, बाबासाहेब नंदीवाले यांनी चर्चा करताना म्हणाले, हातकणंगले नगरपंचायतीचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शाहूनगर, गणेश नगर, पेठा विभाग, लक्ष्मीनगर, श्रीनगर या ठिकाणापासून स्मशान भूमी 3 ते 5 किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. परिणामी नागरिकांची आणि पाहुणेमंडळींची गैरसोय मोठ्या प्रमाणात होते. आम्ही स्वतः शाहूनगरमध्ये राहत असून आम्हाला शववाहिका नसलेने मोठी गैरसोय होते. एखादी व्यक्ती मृत झाल्यास 3 ते 5 किलोमीटर अंतर उन्हात , पावसात आम्हाला चालत जावे लागते. यासाठी बऱ्याच अडचणीना सामोरे जावे लागते. सदर गैरसोय लक्षात घेऊन आपण लवकरात लवकर शववाहिकेची सोय करून द्यावी .

  अशी समस्त हातकणंगले गावच्या नागरिकांकडून निवेदन देण्यात येत आहे. तसेच हातकणंगले रुग्णालयसाठी 108 रुग्णवाहिका आहे. पण ती संपूर्ण हातकणंगले तालुक्यातील गावासाठी असलेने बऱ्याच वेळा उपलब्ध नसते.108 रुग्णवाहिका कुरुंदवाड पासून शिरोली आणि वडगाव पासून हुपरी पर्यंत जात असते. त्यामुळे हातकणंगले नगरपंचायतीसाठी रुग्णवाहिका मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले.
  यावेळी आमदार राजूबाबा आवळे यांनी निवेदन स्वीकारून यावर लवकरच शववाहिका आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.आणि फोंडेशन च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सागर नलवडे, सचिन कुंभार, बाबासाहेब नंदीवाले, सचिन बोराडे, अभि बोराडे, अनिकेत बोराडे, गोमटेश रुकडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!