सहायक आयुक्त संजय माळी यांनी वारणा महाविद्यालय भेट

वारणानगर, ता. 29
 येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. संजय माळी यांनी भेट दिली. कौशल विकास उपक्रम आणि रोजगार उद्योजकता संदर्भात प्राध्यापकांना त्यांनी मार्गदर्शनही केले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्रकाश चिकुर्डेकर होते. दरम्यान श्री वारणा विभाग शिक्षण मंडळात प्रशासकीय अधिकारी डॉ.वासंती रासम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

कोल्हापूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. संजय माळी यांचा सत्कार करताना प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम सोबत सहकारी प्राध्यापक.

   श्री. माळी आपल्या भाषणात म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावरती लोकांच्या गरजा आणि बाजाराची मागणी विचारात घेऊन कुशल रोजगार प्रशिक्षण निर्मिती करण्याची गरज आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर मनुष्यबळाचे संस्कार झाले तर जिल्ह्यातीलच नव्हे तर देशातील युवकांना रोजगार मिळेल. गरजू युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमुख करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरावरती शिक्षण घेणाऱ्या युवकांना कमी कालावधीचे प्रशिक्षण, नोकरीच्या संधी आणि सातत्याने त्यांच्या संपर्कात राहून त्यांना दर्जा वर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये ते तरुण पिढी ला कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असून त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास, सेवासुविधा, पर्यटन, कापड, उद्योग, दूरसंचार, संरक्षण क्षेत्र व सेवा, रबर, किरकोळ विक्रेता, विद्युत निर्मिती आणि सहाय्य, मनोरंजन, संगणक प्रशिक्षण, लोखंड- पोलाद, आरोग्य, शेती, ज्वेलरी, फर्निचर व जोडकाम, फुड प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक्स, विमा, बँकिंग, फायनान्स, आरोग्य, मोटर – वाहन, फॅशन, इत्यादी संदर्भातल्या कोर्सचे अभ्यासक्रम तयार असून केंद्रामार्फत प्रशिक्षण घेतल्यास आपल्याच भागात तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. अशा स्थानिक रोजगारांची माहिती विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
  अध्यक्षीय भाषणात डॉ.चिकुर्डेकर म्हणाले की, “युवकांना गरजांवर आधारित कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असून देशाचा तरुण बेरोजगारच असता कामा नये, त्यासाठी इयत्ता दहावी पासूनच कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याची गरज आहे.”
  या वेळी योगेश ऊंडाळे,प्रा.वैभव बुड्ढे, प्रबंधक बाळासाहेब लाडगांवकर  प्रा. नितीन कळंत्रे, प्रा.एन. बी. जाधव, दादासो बच्चे, प्राध्यापक उपस्थित होते. प्रारंभी नॅक समन्वयक डॉ. एस. एस.खोत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. नितीन कळंत्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!