गावठी पिस्टल विकणाऱ्या तिघांना अटक ; कोल्हापुर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई , दीड लाखाचा मुद्देमाल जप्त …..

कोल्हापूर / प्रतिनिधी
        गावठी पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या अमोल भगवान शेंडे (वय वर्ष-३० रा. नेसरी ता . गडहिंग्लज ) , संग्राम चद्रकांत कुऱ्हाडे (वय वर्ष-३० रा. कडगाव रोड , ता . गडहिंग्लज ) , शुभम शांताराम शिंदे (वय वर्ष-२५ रा. अर्जुनवाडी,ता. गडहिंग्लज), या तिघांना कोल्हापुर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली . त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टल व तीन जीवंत राऊंड , तीन मोबाईल संच व मोटरसायकल असा दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला . ही कारवाई आज कागल तालुक्यातील अलाबाद गावच्या हद्दीत मुरगुड कापशी मार्गावर नंद्याळ फाटा येथे केली .


        ही कारवाई पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तानाजी सावंत , सपोनि. सत्यराज घुले , संतोष पवार , यांच्यासह पोलीस कर्मचारी, वैभव पाटील , संजय पडवळ , संतोष पाटील , रणजित कांबळे , नामदेव यादव , कृष्णात पिंगळे , कुमार पोतदार , दिपक घोरपडे , राजेंद्र वरंडेकर , उत्तम सडोलीकर यांनी केली .

error: Content is protected !!