भैरवनाथ शिक्षण समुह संचलित केअर हॉस्पिटलमुळे हातकणंगले तालुक्यात क्रांती -आरोग्यमंत्री डॉ . राजेंद्र पाटील-यड्रावकर

हातकणंगले / प्रतिनिधी
     कोरोचीसह आसपासच्या परिसरातील गोरगरीब लोकांना चांगल्या पद्धतीच्या शिक्षणासह उत्तम आरोग्य सुविधा मिळावी. या दृष्टिकोनातून डॉ. प्रदीप पाटील यांनी हॉस्पिटलची स्थापना करून हातकणंगले तालुक्यात क्रांती करण्याचा प्रयत्न केल्याचे कौतुकउद्गगार आरोग्यमंत्री डॉ . राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले. ते कोरोची (ता.हातकणंगले) येथील श्री भैरवनाथ शिक्षण समुह संचलित केअर हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते .

    नाम . यड्रावकर पुढे म्हणाले , शिगावसारख्या खेडेगावातून येऊन कोरोची सारख्या ग्रामीण भागात शिक्षण संस्थेची स्थापना करून उत्तम पाया रोवला आहे. पहिलीपासून बारावीसह नर्सिंग कॉलेजच्या मोफत शिक्षणाची सुविधा सुरू करून सर्वसामान्यांची सेवा केली आहे .
     मा. आम. डॉ .सुजित मिणचेकर म्हणाले , डॉ . प्रदीप पाटील यांनी भैरवनाथ शिक्षण संस्था 2007 साली सुरू केली असून चिकाटीच्या जोरावर उत्तम पद्धतीने त्यांचे चालविली आहे . या सेवाभावी कामात त्यांना घरासह नातेवाईकांतून सुद्धा सहकार्य मिळाल्याने नर्सिंग कॉलेज सुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू ठेवले आहे . पण त्याचबरोबर नव्याने सुरु होत असलेले सुसज्ज हॉस्पिटल हे माझ्या हातकणंगले तालुक्यात होत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे .

      यावेळी पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील , डीवायएसपी गणेश बिरादार , पोलीस निरीक्षक प्रकाश निकम , शरद साखर कारखान्याचे संचालक दशरथ पिष्टे , सरपंच सौ रेखा पाटील , उपसरपंच लाखन कांबळे , पोलीस पाटील सावकार हेगडे , डॉ. शुभांगी पाटील , डॉ.रणजीत पाटील , डॉ.ए. बी. पाटील , संदीप उपाध्ये , अनिकेत कांबळे , प्रवीण उमराणीया , शंकर हलगीकर संजयकुमार चिले , खंडेराव विभुते , संजय चौगुले, महेश चव्हान ,संजय हुबरकर यांच्यासह अन्य मान्यवर नागरिक सोशल डिस्टन्स ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक डॉ . प्रदीप पाटील यांनी केले. तर आभारासह व सूत्र संचलन प्रणाली कांबळे यांनी केले.

error: Content is protected !!