संविधानाची माहिती ग्रामपंचायतीच्या सोशल मिडीयावर व ग्रामपंचायत कार्यालयात मिळणार -गटविकास आधिकारी अरुण जाधव ;माहितीचा लाभ घेण्याचे आवाहन

हातकणंगले/ता.२०- प्रतिनिधी

 

गटविकास आधिकारी
अरुण जाधव

           भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानातील मुलभूत अधिकार, कर्तव्ये याबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणेसाठी मार्गदर्शन शिबीर, माहितीपर व्याखाने करण्याचे नियोजन करणेत आले होते. परंतु सद्या सुरु असलेल्या कोव्हीड १९ , वाढत्या प्रसारामुळे सोशल डिस्टंन्सचे पालन करणेच्या उद्देशाने या बाबतची माहिती हातकणंगले तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सोशल मीडिया व कार्यालयातुन माहिती घ्यावी.असे आवाहन हातकणंगले पं.स. चे गटविकास आधिकारी अरुण जाधव यांनी केले आहे.

        जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांचेकडून आलेल्या सुचनेनुसार श्री. र. ना. बावनकर, अध्यक्ष, हातकणंगले तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश-१, इचलकरंजी यांचे मार्गदर्शनाखाली २६ नोव्हेंबर २०२० ला भारतीय संविधान अंमलात येवून ७० वर्षे पुर्ण होत असलेने २६ नोव्हेंबर, २०१९ ते २६ नोव्हेंबर, २०२० या एक वर्षामध्ये भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानातील मुलभूत अधिकार, कर्तव्ये याबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणेसाठी मार्गदर्शन शिबीर, माहितीपर व्याख्याने घेण्याचे नियोजन करणेत आले होते. परंतु सद्या सुरु असलेल्या कोव्हीड १९ वाढत्या प्रभावाने ही माहिती हातकणंगले तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सोशल मिडियावर दिलेली आहे. तसेच 26 नोव्हेंबर 2020 पर्यंत दर दोन महिन्याला संविधानाबाबतची माहिती ग्रामपंचायतीच्या सोशल मीडिया वर दिली जाईल,तरी सर्व नागरिकांनी माहिती लाभ घ्यावा, असे आवाहन हातकणंगलेचे पंचायत समितीचे गटविकास आधिकारी तथा सदस्य सचिव,विधी व सेवा आधिकारी अरुण जाधव यांनी केले आहे.

error: Content is protected !!