नवे पारगाव/ता.१९- प्रतिनिधी
देशात कोरोना सारख्या विषाणुने थैमान घातले असताना महाराष्ट्र राज्यातील महावितरण कंपनीने कोरोना लाॅकडाऊनच्या काळात व्यापारी,शेतकरी,कष्टकरी, शेतमजुर अशा सर्वच समाजघटकांना अवाजवी वीज बीले आली आहेत .सध्या लाॅकडाऊन मुळे सर्व सामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली असताना हे बिल भरणे शक्य नसल्याने आज अंबप (ता.हातकणंगले) गावात चावडी पटांगणात दलित महासंघाच्या वतीने वीज बिलांची होळी करण्यात आली.

तसेच ग्रामीण व शहरी भागातील महीलांना विविध बचतगटांमार्फत फायनान्स कंपन्यांकडुन सध्यस्थितीत दिलेल्या कर्जवसुलीचा तगादा वाढल्याने मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे न्याय्य मागणार असलेचा इशाराही दलित महासंघाचे वतीने देण्यात आला.दरम्यान अंबप गावात पूर्वकल्पना देऊनही बुधवारी निवेदन स्विकारण्यास कुणीही प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांचा दलित महासंघाचे वतीने जाहीर निषेध करून वीजबीलांची जाहीर होळी करण्यात आली.
यावेळी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासो दबडे म्हणाले, महाराष्ट्राकडुन कर्नाटक सरकार वीज विकत घेऊन कर्नाटकातील जनतेला मोफत पुरवठा करते . तर महाराष्ट्रात वीज तयार होत असताना महाराष्ट्राच्या जनतेवरच अन्याय का?असा सवाल उपस्थित करत दबडे यानी लाॅकडाऊन काळातील राज्यातील जनतेचे वीजबील माफ करण्याची मागणी केली यासाठी गावच्यावतीने लाॅकडाऊन काळातील सर्व वीज बिल माफ होण्यासाठी मा.मुख्यमंत्री साहेब यांचेकडे निवेदनाद्वारे कळविणे करता १००० हुन अधिक लोकांच्या सहींचे निवेदन देणार असल्याचे संघटक अशोकराव गायकवाड यानी सांगितले.
यावेळी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासो दबडे, संघटक अशोकराव गायकवाड, उपाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, बाळासो आवळे, राजेंद्र दाभाडे, रवी दाभाडे, नंदाबाई दाभाडे, सिमा दाभाडे,संगीता दाभाडे,अर्चना दाभाडे,वसंत हिरवे,सुनील जकाते,ग्रा. पं. सदस्य सागर डोंगरे, शिवसेनेचे प्रविण माळी,सर्जेराव दाभाडे,किरण दाभाडे,संतोष दाभाडे यांचेसह महीला व ग्रामस्थ उपस्थित होते.अनुचित घटनेच्या अणुषंगाने वडगाव पोलीस ठाण्याचे वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.