वेतनवाढ झाल्याबद्दल ग्रामपंचायत कर्मचारी युनियन कडून राज्यमंत्री यड्रावकर यांचा सन्मान

जयसिंगपूर /ता. २०-प्रतिनिधी

          महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणी ठरविण्याबाबतचा शासन दरबारी अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न सोडवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भरघोस पगार वाढ मिळवून देण्याकामी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन शिरोळ तालुक्याच्या वतीने नाम. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा सन्मान करण्यात आला, युनियनच्या वतीने राज्यमंत्री यड्रावकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभाराचे पत्र ही देण्यात आले,
        ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनवाढ मिळावी . यासाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू होता . संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना भेटून संघटनेच्या आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते . यावर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यानी ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत अवगत करताना वेतनवाढी बाबत निर्णय घेतला जावा अशी मागणी केली होती . महाविकास आघाडी सरकार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत त्यांना भरघोस पगारवाढ देण्याबाबतचा निर्णय घेतला, राज्यातील लाखो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून या पुढच्या काळात सुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आपण पाठपुरावा करू . अशी ग्वाही राज्यमंत्री यड्रावकर यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिली.
            ग्रामपंचायत कर्मचारी संघटना शिरोळ तालुक्याचे अध्यक्ष गौसपाक मुलानी, राज्य संघटक दत्तात्रय चव्हाण, कार्याध्यक्ष सचिन चूडमुंगे, सतीश भोसले, अशोक पाटील, संजय चव्हाण, अरुण पकाली, सुरेश पाटील, जब्बार बाणदार, सतीश तिवडे, समुद्र कांबळे, अभिनंदन नरसगोंडा, अमोल देवाजे, राजू हलोंडे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!