इस्लामपूर /ता. २०-जितेंद्र पाटील
कापूसखेड (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने दिव्यांग योजना निधी मधून दिव्यांगांना सिलिंग फॅनचे वाटप करण्यात आले. सरपंच मंदाताई धुमाळे, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपतराव पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे माजी संचालक जयसिंगराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब पाटील , सदस्या नंदा देसाई, लक्ष्मीताई कोळी, माजी चेअरमन डी. के. पाटील, सामाजिक कार्यकर्ते एस. के. पाटील, भानुदास देसाई, तंटामुक्तीचे अध्यक्ष हौसेराव पाटील, बी. आर. पाटील, भिमराव पाटील, प्रविण पाटील, अशोक धुमाळे, देवानंद साळुंखे, प्रल्हाद धुमाळे, पांडूरंग बल्लाळ यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
