इस्लामपूर /ता.२१-प्रतिनिधी – जितेंद्र पाटील
इस्लामपूर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा शहरातील चौथा लॉकडॉऊन आहे. कोरोनावर मात केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात येत असताना पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळल्याने इस्लामपूर नगरपरिषद, प्रशासन व सर्व पदाधिका-यांच्यामध्ये झालेल्या आॅनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तीन दिवसांसाठी हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. दि. २३, २४ आणि २५ रोजी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र नेमका गणेश उत्सव याच काळात असुन आता प्रतिक्षा राहिली आहे इस्लामपुरवासीय लॉकडाऊनला कसा प्रतिसाद देतात ते पाहण्याची .