पुण्यस्मरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ; रसाळ कुटुंबाचा आदर्श पांयडा

इस्लामपूर / ता .२१- जितेंद्र पाटील

    वडिलांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या पारंपारिक कार्यक्रमाला फाटा देत सामाजिक बांधिलकी म्हणून देशावर उद्भवलेल्या संकटात कोविड मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत देऊन रसाळ कुटुंबाने एक आदर्श पायंडा पाडला आहे . असे गौरवोद्गार पालकमंत्री जयंत पाटील यांनी काढले.

कारंदवाडी : पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे कोविड मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदतीचा धनादेश देताना विकास रसाळ व सर्व कुटुंबीय.

    कारंदवाडी (ता. वाळवा) येथील विकास रसाळ यांनी त्यांचे वडील कै .विलास रसाळ यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमीत्त २५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे हा धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. रसाळ कुटुंबियांनी कारंदवाडी येथील शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपावेळी हा धनादेश मंत्री पाटील यांच्याकडे दिला. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे, अतिरीक्त निबंधक सहकारी संस्था विकास रसाळ, प्रकाश रसाळ, सुरेश रसाळ, संतोष रणशिंगे, श्रेणिक कबाडे, आदि मान्यवर उपस्थित होेते.

error: Content is protected !!