इस्लामपूर /ता .२० – जितेंद्र पाटील
येथील कर्ण प्रतिष्ठानच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमीत्त कापूसखेड (ता. वाळवा ) येथे गरजू लोकांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप केले. यावेळी माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, स्वरूप मोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित साळुंखे, उपाध्यक्ष सुशांत मोरे, सचिव बिपीन राजमाने, उमाकांत कापसे, रणजीत घोरपडे, पृथ्वीराज मोकाशी, रोहित पाटील, श्रीकांत चव्हाण, अंकुश मस्के उपस्थित होते.
