पाटण / ता. २१-प्रतिनिधी
पाटण शहरात ११ ते १९ ऑगस्टपर्यंत लाँकडाऊन पुकारला होता . २०ऑगस्टला १० दिवसाचा लाँकडाऊन संपताच पाटण शहरातील बाजारपेठ सुरु झाली . पाटण तालुक्याच्या विविध विभागातील नागरिकानी तोबा गर्दी केल्याने पाटण शहरातील सोमवारपेठेत वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याने अर्धातास वाहतुक ठप्प झाली होती . त्यामुळे कोरोनाच्या छाये खाली असलेल्या पाटण शहरात पुन्हा कोरोनाचा जास्त शिरकाव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली . असून भितीचे वातावरण पसरले आहे .
पाटण शहरात कोरोनाने चांगलेच डोकेवर काढले होते . त्यामुळे शहरात ११ते १९ ऑगस्ट पर्यंत १० दिवसाचा लाँकडाऊन पुकारण्यात आला होता. लॉकडाऊन संपताच पाटण शहरात गणपतीचे सजावटीचे विविध साहित्य व बाजार खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दुकानांमध्ये तोबा गर्दी केली होती . लोक विनाकारण रस्त्यावर येवू लागले आहेत. खरेदीसाठी लोक गाड्याकरून कुटुंबांसमवेत पाटण शहरात येत आहेत. सोशल डिस्टन्सींगचा तर पुरता फज्जाच उडाला होता .चारचाकी व दुचाकीवरून फिरताना पाटण शहरात गुरुवारी २० रोजी सोमवारपेठेत वाहतुकीची मोठ्ठी कोंडी झाली होती . तर काहीचे तोंडाला मास्क आहे . तर लहान मुलांच्या तोंडाला मास्क नाही. जणू काही आपल्याला कोरोना होणारच नाही . या अविर्भावात लोक गर्दी करत फिरत आहेत. कोणाला, कशाचे काहीच फरक पडलेला दिसत नव्हता . लॉकडाऊन काळात नियम पाळण्यासंदर्भात पाटण पोलीस व नगरपंचायत प्रशासनाकडून सातत्याने माईकद्वारे जनजागृती केली जात आहे. मात्र पाटणची जनता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती .
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा आपले काम चोखपणे बजावत आहे. प्रसंगी गर्दी होवू नये म्हणुन सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे . कोरोना हा जागतिक रोग असल्याने त्याला रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी हातात हात घालून लढा दिला पाहिजे. त्यासाठी सर्वांनीच रस्त्यावर येवून चालणार नाही . तर शासनाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली तरी पुरेसे आहे. त्यामुळे अद्यापही वेळ गेलेली नाही. जनतेने वेळीच सावध झाले पाहिजे . अन्यथा पाटण शहरात पुन्हा कोरोनोचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही.
दुकानांसमोरील चौकोन गायब – शासनाकडून सोशल डिस्टन्सींग ठेवून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली खरी. मात्र आजच्या घडीला प्रत्येक दुकानासमोर तोबा गर्दी पाहुन दुकानदार फक्त पैशाच्या पाठीमागे लागल्याचे दिसून आले डिस्टन्सींगसाठी आखण्यात आलेले चौकोन गायब झाले आहेत. सॅनिटायझरचा वापर करणे बंद झालेले आहे. सर्वकाही पूर्वीप्रमाणेच सुरू आहे.त्यामुळे या दुकानदारांकडे नगरपंचायतीचे लक्ष आहे की नाही असा सवाल सुज्ञ नागरिक करीत आहेत