मुंबई / प्रतिनिधी
समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने मुंबईतील राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याची भेट घेतली . यावेळी समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी यानी ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाबाबात चर्चा केली. राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला सकारात्मक निर्देश देण्याचे वचन दिले .

यावेळी ब्रम्ह महाशिखर परिषदेचे प्रवक्ते विश्वजीत देशपांडे यानी ब्राह्मण समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या व त्यांच्या ग्रामीण भागातील अडचणीसह व्यथा राज्यपाल याना सांगितल्या .
यावेळी मकरंद कुलकर्णी यानी राज्यसरकारशी आज पर्यंत झालेला पत्रव्यवहार व आजची स्थिती कथन केली . यावेळी संजीवनी पांडे यानी ब्राह्मण समाजातील महिला त्यांची आर्थिक व शैक्षणिक स्थितीबाबत अडचणी सांगितल्या .
तसेच ॲड. आरती सदावर्ते – पुरंदरे यानी ब्राह्मण समाजावर होणाऱ्या लिखाणावर बंदी घालावी , व ब्राह्मण समाजाच्या सरक्षंणासाठी कडक कायदे करावे. असेही त्या म्हणाल्या
यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी सगळ्या अडचणी ऐकून घेवुन तसेच सकारात्मक चर्चा करून राज्य सरकारला निर्देश देण्याचे अभिवचन दिले .