केंद्रीयस्तर पहाणीत शामराव पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अव्वल…. 

वारणानगर /शिवकुमार सोने
    तळसंदे (ता. हातकणंगले) येथील शामराव पाटील खाजगी औद्योगिक प्रशिक्षण (आय.टी.आय) संस्थेला केंद्रीयस्तर पहाणीत प्रथम क्रमांक मिळाला. नवी दिल्लीच्या डी.जी.टी.पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील ४२ आय.टी.आय.टी.आय.ची ग्रेडींग प्रशिक्षण – २ तपासणी केली.

तळसंदे,(ता.हातकणंगले) येथील शामराव पाटील शिक्षण समुहाच्या आयटीआय खाजगी प्रशिक्षण संस्थेतील केंद्रीय स्तर पाहणीतील छायाचित्र….

    हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील जोतिर्लिंग शिक्षण संस्था संचलित, शामराव पाटील खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने जिल्हात २.४४ गुणांनी प्रथम क्रमांकावर मजल मारली आहे. येथे विजतंत्री, फिटर, ड्रॉफ्टसमन ,मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिक, वेल्डर, पेन्टर (जनरल),कोपा आदी व्यवसाय अभ्यासक्रम सुरू असून यासाठी उच्च प्रशिक्षित निर्देशक वर्ग कार्यरत आहे. संस्थेत प्रशिक्षणार्थ्यांना कुशल कारागीर व उद्योजक घडविण्याचे कार्य संस्थेचे सचिव प्रा.आण्णासो पाटील, अध्यक्ष प्रा.रूपाली पाटील, व्यवस्थापक जयदिप पाटील, प्रा.विनोद काटकर यांच्यासह सर्व निर्देशक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मार्फत होते.  
     केंद्रीय समितीने औ. प्र. संस्थेची सुसज्ज इमारत, कार्यशाळा, क्लासरूम, सगंणक कक्ष, ग्रंथालय, कार्यशाळेमध्ये  साधनसामुग्री, सुसज्ज स्टोअर रूम, याशिवाय सलग ११ वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा, उच्च प्रशिक्षित निर्देशक वर्ग,नामवंत कंपन्यांशी नोकरी करार, शिकाऊ उमेदवार उपलब्धता, प्रत्यक्ष कंपनीत दुहेरी प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थ्यांना  कारखाना भेटी, सोयींनीयुक्त वस्तिगृह व उपहारगृहाची सोय आदी बाबी विचारात घेऊन गुणानुक्रम निश्चित केले.

error: Content is protected !!