सांदीपणीत गुरुकुल आणि अपना बँकेच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन संपन्न …

रत्नागिरी /प्रतिनिधी
येथील सांदीपनी गुरुकुल येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यांच्यामध्ये चांगले विचार रुजावेत , यासाठी सांदीपनी व अपना बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी विविध विषय घेऊन वाचन केले, व आपले विचार मांडले या कार्यक्रमाला अपना बँकेचे व्यवस्थापक श्री केसरकर ,सामाजिक कार्यकर्ते श्री आर्ते ,अधीक्षक श्री कारखानीस ,श्री भोसले, सौ रेवा कदम , सौ सुर्वे ,सौ कारखानीस आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी यावेळी वाचनाचे महत्त्व तसेच वाचन कशा पद्धतीने करावे , याविषयी मार्गदर्शन केले .

     विद्यालय अधीक्षक श्री कारखानीस यांनी आभार मानुन, या अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक वाढ होण्यास निश्चितच मदत होईल असे म्हटले .
      या कार्यक्रमाचे नियोजन संदीपनीतील विद्यार्थ्यांनी केले. तसेच श्री कुळ्ये यांचा यामध्ये सिहांचा वाटा होता. सूत्रसंचालन कु. ऋतिक उंडे या विद्यार्थ्यांने केले .

error: Content is protected !!