इस्लामपूर /ता.२२- प्रतिनिधी
कोरोनाचे जागतिक विघ्नं दूर करा. अशी अपेक्षा व्यक्त करत वाळवा तालुक्यात विघ्नहर्ता गणरायाचे मोठया उत्साहात मात्र साध्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. यावर्षीच्या उत्सवावर कोरोनाचं संकट आहे. तरीही घरगुती पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून गणपती बाप्पाचे प्रत्येकाच्या घरी आनंदात स्वागत करण्यात आले. यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनेक गावात कोरोनामुळे एक गाव एक गणपती ही संकल्पना लागू केली आहे. संपूर्ण जगात कोरोनाचा धुमाकुळ सुरू आहे. जगावर आलेले हे संकट वाढतच चालले आहे. हे जागतिक विघ्नं दूर करण्यासाठी सर्वचजण गणरायाला साकडं घालताना दिसत आहेत.
