इचलकरंजी /ता२३-प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्यावतीने भव्य आरास स्पर्धा आयोजित केली आहे . स्पर्धा रोटरी परिवार , इचलकरंजी शहरवासीय व सार्वजनिक गणेश मंडळासाठी अशा तीन गटात घेतल्या जाणार आहेत .स्पर्धा इचलकरंजी शहरासाठी मर्यादित असुन प्रत्येक गटातील विजेत्यांना ट्रॉफी , सर्टिफिकेट व भेट वस्तू दिल्या जाणार आहेत. तरी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लबकडुन करण्यात आले आहे.
स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्यांनी इकोफ्रेंडली साहित्याचा वापर करण्याचा आहे . तसेच थर्माकोल व पर्यावरणास हानिकारक साहित्याचा वापर टाळायचा आहे . रोटरी परिवार , शहरवासीय व मंडळाच्या स्पर्धकांनी श्रींच्या मूर्तीचा , डेकोरेशनचा व पारंपारिक वेशभूषेतील आरतीचा फोटो यासह मंडळांनी सामाजिक संदेश देखाव्याचे फोटो काढावेत . सर्व फोटो व्हाट्सअप वर पाठविण्याचे आहेत . फोटो पाठविणेची नंबर पुढील प्रमाणे .
१ )अभय येळरुटे – 9822109522
२ ) दीपक निंगुडगेकर – 9975436969
३ ) प्रकाश गौड – 9422048658
४ ) संतोष पाटील – 9422049218
