ओम गणेश मित्र मंडळ; छ. शिवाजी पेठ क।।तारळे. ता. राधानगरी. जि. कोल्हापूर

      अवघ्या मराठी जनतेला गणेशोत्सव सारख्या अनमोल सणाची भेट देणार्‍या लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन. सात हजार लोकसंख्या असणार्‍या आमच्या गावामध्ये भरवस्तीत अर्थात बाजारपेठेत ‘पेठेचा राजा’ नावाने प्रसिद्ध असलेल्या आमच्या मंडळाची एक विशिष्ट ओळख आपणासमोर सादर करण्याचा छोटासा प्रयत्न…

         बारा बलुतेदार मंडळींनी परिपूर्ण असणारे असे आमचे मंडळ असुन; आज या मंडळास 36 वर्षे पुर्ण होत आहेत. आमचे भाग्य मोठे की, आम्ही मंडळाचे सभासद आहोत. आमच्या जुन्याजाणत्या मंडळींमुळे 37 वे वर्ष पाहु शकलो. सर्वधर्म समभाव जोपसणारे हे मंडळ यशस्वी पदार्पण करत आहे. एकेकाळी अवघ्या दोन फुट उंची असणार्‍या गणपतीची तीन वर्षांपासुन भल्यामोठ्या मंडपात राजेशाही थाटात प्राणप्रतिष्ठापणा होतो. आज जागतिक स्तरावर सुरू असणार्‍या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मंडळाच्या मुर्तीची उंची 4 फुट आहे आणि यावर्षीचा सोहळा आम्ही अत्यंत साध्या पद्धतीने करत आहोत. मंडळाचे इतर सभासद ही उत्तम रीतीने सहकार्य करत आहेत. या मंडळाने अनेक समाजप्रबोधनपर देखावे मंडळाने सादर केले होते. त्यांतील देवा गणेशा, व्होल्टम-दारूबंदी, पांडवकालीन मंदीर अशी उदाहरणे ऐकायला येतात. काहीवेळा आम्ही स्वतः विनोदी नाटिका केल्या होत्या. आज या गणेश मंडळामध्ये 58 सभासद आहेत; मात्र मंडळाचे सभासद एकदिलाने राबताना दिसतात तेव्हा, ते त्यापेक्षा जास्तचं वाटतात; हे मंडळ प्रत्येक मंडळासमोर एक आदर्श प्रस्थापित करत आहे. जल्लोषामध्ये बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडतो तर; काही वेळा भजन म्हणत बाप्पा गावच्या नदीमध्ये विसर्जित केला जातो. मंडळ हे केवळ सणासुदी साठीचं नसतं तर; समाजात घडणार्‍या प्रत्येक घटनांवर एक अमृतकुंभ असतं. सुखदुःखाच्या ठिकाणी आपुलकी आणि प्रेमभाव व्यक्त करणारं हे एक मंडळचं असतं. अशाच या आमच्या ओम गणेश मित्र मंडळास आपुलकी आणि प्रेमभावाचे संबंध अखंडीतपणे राहो हीच ईच्छा.
सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या मनःपुर्वक भक्तीपुर्ण शुभेच्छा…

                         गणपती बाप्पा मोरया…

लेखन- शुभम बोधे ( बंडु )

error: Content is protected !!